*श्रीकृष्ण मंदिर परिसर आरोग्य अधिकाऱ्यांना व मनपा कर्मचाऱ्यांना बोलाउन केला स्वच्छ. नागरिकांनी मानले आभार..*

IMG_20251104_170008.jpg


अमळनेर( प्रतिनिधी)नेहमी अस्वच्छ राहत असल्याने त्याचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आरोग्य अधिकारी श्री संतोष माणिक यांना साने नगर येथील समस्यांचे गाऱ्हाणे मांडताना परिसरातील नागरिक व संदीप सैंदाणे यांनी बोलावून घेतले व प्रत्यक्षदर्शी स्थळ निरीक्षण केले. परिसरात अनेक समस्या आ वासून उभ्या असताना प्रशासन लक्ष देत नाही म्हणून नागरिक संतप्त झाले होते. लवकरात लवकर श्रीकृष्ण मंदिर परिसर व हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून तेथील काटेरी झुडपे तोडून येथे नाना नानी पार्क बसवण्यासाठी व तार कंपाऊंड करण्यासाठी लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी खेळण्याचे साहित्य, महिला पुरुषांना निवांत बसण्यासाठी बागडे(टेबल) व मॉर्निंग वॉक करण्यासाठी रस्ते पेवर ब्लॉक बसवणे, ओपन जिम साहित्य बसवणे. नदीच्या पुरामुळे रहिवाशांचे व घरांचे नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण भिंत बनविणे, असे कामे मंजूर करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. निवेदनावर साने नगर येथील अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page