नगर अध्यक्ष साहेब अति तातडीने रस्ता बनवा.. नागरिकांची मागणी.

IMG-20260214-WA0000.jpg


अमळनेर (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक दोन मधील गणेश कॉलनी चा रस्ता अर्थात श्रीराम नवल पाटील ते दूधवाला नाना यांच्या गलितिल रस्ता शेवटची घटका मोजत आहे. अनेक वर्षापासून तो रस्ता विकासाच्या प्रतीक्षेत आहे. पायी जाणे सुद्धा मुश्किल झालेले असून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मुळे व पोट गटारीच्या पाईप लाईन मुळे त्या रस्त्यावर मोठे मोठे दगड मारून पडलेले आहेत. त्याच्यावर पावसाळ्यात
डाग डुजी करण्यासाठी प्रशासनाला मुरूम सांगितला तर त्यांनी मुरूमच्या नावावर दगड टाकून दिलेली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून तो रस्ता रहदारी साठी योग्य नसून अक्षरशा पायी चालणारे लोक सुद्धा त्या रस्त्याने वापरत नाहीत. कारण बऱ्याच वेळेला पाय सरकून व दुचाकी सरकून अपघात झालेले आहेत. आम्ही निवडून आलो तर नगराध्यक्ष निवडीनंतर लगेच रस्त्याचे काम सुरू करू असे सांगणारे पराभूत उमेदवार त्यांचा नाईलाज झाला. आणि निवडलेले नगरसेवक यांचे लक्ष पाणीपुरवठा खात्याकडे (यंत्रणेकडे) वळल्यामुळे त्या गल्लीतील रहिवाशांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे .असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता आम्ही प्रस्ताव टाकला आहे. आता मीटिंगा होतील कृती आराखडा मंजूर होईल तद नंतर तुमचा रस्ता बनवू असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तो सुद्धा नागरिकांचा नाईलाज आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी एकदा तरी त्या रस्त्यावर यंत्रणेसह बघायला यावे अर्थात व्हिजिट करावी व आमच्या गैरसोयीचे दर्शन घ्यावे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. तुम्ही प्रचाराला आले नाही तरीसुद्धा तुम्हाला आम्ही भरभरून मते दिली. त्याची उतराई म्हणून आमच्या प्रभागातील कामे करा व आणि आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक तेथील नागरिकांची आहे. स्वतः श्रमदान करून नागरिक वेळ मिळाला तसे येथून दगडे काढतात व साईडला फेकतात. त्यामुळे ये – जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये या उद्देशाने तेथील नागरिक स्वतः हे काम करतात. प्रशासक होते तेव्हा ठीक आहे आता लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी अशी कामे हातात घ्यावीत हीच माफक अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page