*भुमिअभिलेख कार्यप्रणाली आणि कर्तव्यनिष्ठा, आहे का?*

1000111383.png

भूमि अभिलेख जनतेचा सेवक नोकर आहे. यांत शंका नाही. भूमि अभिलेख हे जमिनीचा अभिलेख तयार करनेचे काम करते. पहिला भूमि अभिलेख हा इंग्रज शासन काळात तयार झाला आहे. तोच पहिला भूमि अभिलेख आधारे जमीन मोजणी झाले नंतर जुना तयार असलेला भूमि अभिलेख मेळात घेऊन कर्मचारी सीमांकन करता. ज्या इस्माची मोजणी झाली नाही. त्याच कारण कि जो जुना अभिलेख एकत्रिकरण वेळी झाला तो जागेशी मेळात येत नाही. त्यासाठी दुरुस्ती सक्षम अधिकारी यांची पडताळणी चौकशी झाले नंतर त्यांचे मोजणी काम होईल. दुरुस्त बाबत अर्ज पूर्तता करावी.
सन 1816 पासून भूमि अभिलेखचा कर्मचारी हा शेतकरी चा सेवक मित्र आहे.लांब पल्याच गाव गाठून 40°-45° तापमानात उन्हात तो काम करतो. माजी अभिलेख रेकार्ड प्रमाणे आजही काम करतो. भूमि अभिलेख चा नकाशा वरून भूमि विकास नियोजन प्राधिकरण हे रस्ता, रेल्वे, विमानतळ, तलाव धरण, बिनशेती प्लॉट चा अभिलेख तयार करतात. यांत सर्व इंजिअर यांना तांत्रिक वेतन टेबलावर बसून मिळते. मात्र जो अभिलेख तयार करतो तो भूमि अभिलेख चा कर्मचारी क्लर्क चे वेतणावर समाधान मानून काम करीत आहे. भूमि अभिलेख हा सुद्धा तांत्रिक विभाग आहे. त्यांना अतांत्रिक वेतन का मिळते.
जमीनीचे क्षेत्र सातबारावर लिहीले असते.जर इकडचा तिकडे बांध सरकला तरीही क्षेत्र तितकेच असणार.नवीन जमीन वाढत नाही किंवा कमी होत नाही.जमीन आकुंचन पावत होत नाही किंवा प्रसरण होत नाही.
पण कोणी एकाने दुसऱ्याच्या जमीनीवर अतिक्रमण केले आणि माहिती झाले तर मोजणी करणे हाच एक इलाज आहे.यासाठीच तर भुमि अभिलेख खाते आहे.
जर एकत्रीकरण करतांना नकाशा चुकला असेल तर तशी लेखी स्वरूपात खबर शेतकरी ला दिली पाहिजे.पण शेतकरी ला काहीच न कळवता नकाशा चुकीचा आहे,असे कसे म्हणता येईल?
जर काहीही काम करून घेण्यासाठी शेतकरी कडून अर्ज पाहिजे.फी पाहिजे.पुरावा पाहिजे.तो दिला आहे.तर मग काही फेरबदल परस्पर केले तर शेतकरी ला कळवले पाहिजे.मी तुमच्या खिशातून गुपचूप पैसे काढून घेतले तर चुकीचे आहे.तसे कोणी अतिक्रमण केले तर मोजणी करणारच.
नकाशा कोणी बनवला? नकाशा कोणी चुकवला? शेतकरी ने कि नोकरांनी?जर शेतकरी ने चुकवला असेल तर आम्ही नकाशा बनवून देतो.नोकरांनी चुकवला असेल तर नोकरांनी दुरूस्त केला पाहिजे.
अर्ज करतो.पुरावे जोडतो.फी भरतो.यात शेतकऱ्यांची काय चूक?ही तर भुमि अभिलेख ची कार्यप्रणाली आहे.
नोकरी करतात, पगार घेतात तरीही काम करीत नसेल तर नोकरांची चूक नाही का?
नोकर काम करीत नाहीत किंवा चुका करतात तर त्यांना हाकलण्यासाठी आमदार खासदार मंत्री असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page