_अमळनेर येथील आईस्क्रीम पार्लर झाले, अनधिकृत कपल पॉईंट…_

1000111195.png


प्रतिनिधी,.. अमळनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी तसेच इतरत्र कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम पार्लर उघडले गेले आहेत. अनेक तरुण आणि तरुणी या पार्लरवर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र तासंतास तेथे बसत असतात. आत्याधुनिक बैठक व्यवस्था असल्यामुळे त्या तरुण-तरुणीं बाहेरून तसेच रस्त्यावरून सहजासहजी उघड्या डोळ्यांना किंवा दृष्टीस पडणार नाही अशा पद्धतीने त्यांची सोय केली गेलेली असते अशा पद्धतीने बसायची सोय केल्यामुळे त्यांना तासाचे पैसे मिळतात जसे की एका तासाचे हजार इतकी रक्कम देऊन आपल्या मनाला मोकळे करण्यासाठी जशी आईस्क्रीम पार्लर ही हक्काची जागा तरुण-तरुणींना मिळाली आहे. अमळनेर शहरातून व तालुक्यातून काही तरुणी आई-वडिलांना खोटे कारण सांगून आईस्क्रीम पार्लरचा चारा घेऊन आपल्या मित्रांना एक त्यामध्ये भेटतात त्याच्यामुळे अनेक गैरप्रकारांना खतपाणी मिळते आहे त्यामुळे संबंधित आइस्क्रीम पार्लर वर धाड टाकून चौकशी करावी आणि अशा गैरप्रकारांना आळा बसवावा असे नागरिकांचे मत आहे. मुली आणि मुलं पळून जाऊन विवाह करण्याला तसेच मुलींच्या फसवण्याला कारणीभूत असलेले हे काहीआईस्क्रीम पार्लर त्यांनी अशा प्रकारच्या पैशांचा धंदा करू नये अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे. अमळनेर पोलीस प्रशासनाने या बाबींवर क** कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page