विप्रो कंपनीच्या अरुंद रस्त्यामुळे बोरी काठ परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल…    

IMG-20250530-WA0006.jpg

     अमळनेर.रेल्वे बोगद्याच्या उत्तरेला  विप्रो कंपनी आहे विप्रो कंपनीच्या आजूबाजूला आजचा 11 फुटाच्या उंच उंच संरक्षणभिंती आहेत . दोघात भिंतींच्या मध्ये रस्ता वरची अविरत चालणारी रहदारीआणि गटार  वाहत असते. ती गटार अमळनेर शहरातून येते अर्ध्या अमळनेरचे मलमूत्र विसर्जन तसेच घरातील सांडव्याचे पाणी बोगद्या खालून जाऊन त्यामध्ये विप्रोचे केमिकल युक्त पाणी सोडले जाते व ते न्यू प्लॉट साने नगर परिसराच्या रहिवासी भागांमधून जाते. एखाद्या नदीचे स्वरूप यावे अशी नाल्याची रुंदी आहे. त्यांना आल्यामुळे रधारीला अडथळा होतो त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे नाल्यांमध्ये पडून अपघात होतात दोघं साईडने संरक्षण भिंत आल्यामुळे आणि कंपनीच्या अवजड वाहनांच्या रहदारी मुळे परिसरातील तसेच बोरीकाच्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे या संबंधित समस्येकडे विप्रो प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या गटारीवर स्लॅप टाकून तो रस्ता मोठा करावा ही नागरिकांची गेल्या वीस वर्षांपासून ची मागणी आहे परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोजच्या अपघातांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. बोगद्यामुळे आणि त्या अरुंद रस्त्यामुळे रेल्वेच्या उत्तरेला कोणी रहिवासी नागरिक भाड्याने सुद्धा यायला तयार नसतो . या संदर्भात अनेक वेळा निवेदन दिलेली आहेत परंतु कोणताही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. या अनुषंगाने त्या गटारीवर स्लॅब टाकून त्या गटारीला पोट गटार करावी आणि  ती अंडरग्राउंड गटार नदी पात्रात सोडावी जेणेकरून त्या केमिकल युक्त पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माननीय मुख्याधिकारी साहेब संदीप नेरकर यांची अमळनेर नगरपालिकेत बदली झाल्यापासून एक दिवस सुद्धा त्यांनी रेल्वे बोगदाचा उत्तरेकडील भाग नगरपालिका क्षेत्रात येतो आणि त्या एक दोन (१,२) प्रभागात आपण भेट द्यावी  व तेथील रहिवासी नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात असे महाशयांना वाटले नाही. या रस्त्याच्या वापर करणाऱ्या सर्व लोकांचे हाल थांबवावेत अशी जनमानसातून प्रतिक्रिया येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page