*बेवारस गोवंश आणि गोमाता यांच्या विसाव्याने अमळनेरचा रहदारीत खोडंबा…

IMG-20250602-WA0001.jpg


अमळनेर प्रतिनिधी. अमळनेर शहरात सर्व दूर बेवारस कुत्रे आणि बेवारस गोमाता ,गोवंश. यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. ज्यांनी गाई , गुरव जनावर पाळली त्यांनी त्यांचे संगोपन व पालन पोषण करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. परंतु अमळनेर शहराच्या प्रत्येक प्रभागांमध्ये असंख्य गाई आणि गोवंश तसेच बेवारस कुत्रे घोडक्यांनी फिरताना दृष्टीस पडणे नित्याचेच झाले आहे. गाईचे पिल्लू मोठे झाले तर पद्धतशीर त्यांना विक्रीसाठी काढले जाते तेव्हा त्याचा मालक बरोबर त्या वासराचा किंवा बैलाचा मालक होऊन मिरवतो व त्याचा मोबदला घेतो. परंतु जीवनभर त्याचे पालन पोषणाची व राहण्याची व्यवस्था करण्याची आवर्जून विसरतो. त्याची गाय जणू काय अख्या अमळनेरच्या नागरिकांची गोमाता आहे आणि त्यांनी तिला खाऊ पिऊ घालावे परंतु तिने दिलेले पिल्लू मात्र मालकाने विकावे हा अजब गजब न्याय अमळनेर शहरात सर्वत्र दिसून येत आहे. या बेवारस गुराढोरांच्या मालकांना एकत्र घेऊन. त्यांना चांगला दंड आकारला पाहिजे किंवा त्यांच्या मालकीच्या गुराढोरांची अशी दुर्दशा व हेडसांड होते म्हणून त्यांच्यावर कायद्याचा बडगा दाखवावा. कोणत्याही मुख्य रस्त्यावर गुराढोरांची बसणे त्यामुळे रस्त्याला होत असलेल्या रहदारीचा अडथळा, तसेच रस्त्यावरील अपघात, हे अमळनेरला नित्याचेच झालेले आहे. मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांनी नागरिकांना घेतलेल्या चावा त्यामुळे झालेला मनस्ताप ,शारीरिक आणि मानसिक त्रास हे ग्रामीण रुग्णालयातील आकडेवारीवरून सहज लक्षात येते. या सर्व बाबींना जबाबदार कोण? जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी हेतू पुरस्कार यांच्याकडे दुर्लक्ष का करतात? त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. तज्ञ नागरिक मात्र या सर्व प्रकाराने सुन्न झालेला आहे. असे न करता पालिकेने त्वरित उपाययोजना करून बेवारस जनावरांच्या मालकांना तशा नोटीसी किंवा सूचना देऊन त्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांना होणारा त्रास कमी करावा हीच जन माणसाची प्रतिक्रिया आहे. किंवा अशा गाई व गोवंशाला सेवाभावी गोमाता आश्रमाला हस्तांतरित कराव्या किंवा दान कराव्यात असे नागरिकांना वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page