तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निवेदन….

IMG-20251031-WA0000.jpg



अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व गावे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास अति पावसामुळे  गेला आहे. तहसीलदारांनी आज पावतो अमळनेर तालुक्यात कोणत्याही पंचनाम्यासाठी यंत्रणा सज्ज केली नसून कोणालाही आदेश दिलेले नाहीत. त्यांनी तसे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी करावी व शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची सद्यस्थिती पावसामुळे किती बिकट झालेली आहे असा पंचनामा करावा अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम  पाटील व तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी नागपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. कापसाची बोंडे सढली असून, कपाशी जमिनीवर पडली आहे. मक्का पाण्यामध्ये भिजत आहे ,त्यामुळे त्यांना कोंब फुटले आहेत. वर्षभर खर्च केलेले पिके हातातून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेवर प्रशासनाने लक्ष द्यावे व अमळनेर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा . तहसीलदारांना पंचनाम्यासाठी आदेशित करावे.अशे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page