तांबेपुरा येथील मुख्य रस्त्याला पिण्याच्या पाईपलाईनला गळती.. प्रशासनाची लक्ष देण्याची गरज.
अमळनेर प्रतिनिधी. तांबेपुरा येथील चामुंडा उपहारगृहाच्या समोर यांच्या दुकानासमोरील मुख्य जलवाहिनी फुटली असून लिकेज पाईपातून
पाणी वाहत आहे गेल्या दीड महिन्यापासून ही समस्या तशीच्या तशी असल्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्या लिकेजमुळे पाण्यामध्ये घाण मिसळत असून येथे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन त्या पाईपलाईनचा लिकेज काढावा अन्यथा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन प्रशासनावर मोर्चा ,आंदोलन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
