अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती जमातींना घरकुल साठी जागा उपलब्ध नसल्याने घरकुलाचा निधी जातो आहे परत.
अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती जमातींना घरकुल साठी जागा उपलब्ध नसल्याने घरकुलाचा निधी जातो आहे परत. अमळनेर प्रतिनिधी. अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाज बांधवांना घरकुल मंजूर झालेले आहेत जसे की शबरी आवास योजना रमाई घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना अशा अनेक योजनांचा भरीमार सरकार देत असून अनुसूचित जाती जमाती अर्थात एससी आणि एसटी लोकांना गावातील राजकारणामुळे गावठाण मध्ये जागा उपलब्ध नाही त्या अनुषंगाने त्यांचा घरकुल चा निधी हा परत जाण्याचा मार्गावर आहे कोणताही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत गावातील राजकारणामुळे तसेच जातीवादामुळे अनेक नागरिकांना घरकुलच्या योजना चा फायदा होत नाही त्यामुळे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अर्थात गटविकास अधिकारी यांनी तालुक्याभरात चौकशी करून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना दीनदयाल उपाध्याय या योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देऊन गावठाणच्या हद्दीमध्ये यांना घरकुल बांधन्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
