अमळनेर येथील विप्रो कंपनी समोर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रहिवासी त्रस्त न पा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.
अमळनेर येथील विप्रो कंपनी समोर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रहिवासी त्रस्त न पा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.
अंमळनेर प्रतिनिधी..
सुभाष चौक ते शिवशक्ती चौक या रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पोट गटारीचे काम चालू आहे तसेच विप्रो कंपनीच्या नवीन प्लांट चे काम सुरू आहे त्यांच्यावरील अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्याची अक्षरशः चालन झालेली आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अक्षरशा दररोज अपघाताला निमंत्रण मिळत आहे रहिवाशांच्या या रस्त्यावरून रहदारी करत असताना खड्ड्यांवर अपघातामुळे फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याचा जाब विप्रो कंपनीच्या प्रशासनाला तसेच नगरपालिका प्रशासनाला विचारण्यात गेल्या असता दोघेही जबाबदार अधिकाऱ्यांकडून चे उत्तर मिळतात आणि हे काम कोणा मार्फत चालू आहे असा नागरिकांना संभ्रम निर्माण होतो साने नगर येथील आनंद पाटील व त्याचा लहान मुलगा यांचा नुकताच आज दुपारी अपघात झाला त्याच्यामध्ये लहान मुलास गंभीर जखम झाली आहे नागरिकांनी त्याला उचलले दवाखान्यात नेले तेथे उपचार केले आणि मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनी वारे द्वारे विचारले असता मुख्याधिकारी साहेबांनी उडवावी चे उत्तर दिले मीटिंगमध्ये आहे तुम्हाला वेळ देऊ शकत नाही असे सांगून नागरिकांच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आमच्या प्रतिनिधींशी नागरिकांच्या जमलेल्या जमावाला विचारले असता जर का सात दिवसात या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले नाही खड्डे बुजवले नाही तर नगरपालिका प्रशासनावर भव्य मोर्चा या नागरिकांचा निघेलअसे सांगितले तर नंतर होणाऱ्या दुष्परिणामास नगरपालिका प्रशासन व विप्रो प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
