तांबेपुरा येथील विस्कळीत पाणीपुरवठा मुळे जनता हैरान…
अमळनेर प्रतिनिधी तांबेपुरा परिसराला समता कॉलनी, गणेश कॉलनी, विप्रो कॉलनी, अशा अनेक कॉलनी मिळून जवळजवळ बारा हजार लोकवस्तीचा परिसर आहे परंतु कोणताही लोकप्रतिनिधी किंवा नगरपालिका प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. कमाल अकरा दिवसापासून परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे .पाण्यासाठी लोक दाही दिशा वणवण फिरत आहेत परंतु पाणीपुरवठा कर्मचारी कोणालाही योग्य टाईम सांगत नसल्यामुळे नागरिकांची गैर सोय होत आहे जनतेचा रोष ओढवल्यास नगरपालिका प्रशासनावर भव्य मोर्चा निघण्याची दाट शक्यता आहे .जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघून नये आणि तांबेपुरा येथील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करावा .अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. पाणी पिण्यासाठी पर्यायी दुसरा मार्ग नाही किंवा व्यवस्था नसल्यामुळे कर्तव्यावर जाणाऱ्या नागरिकांना अक्षरशः घरात प्यायला पाणी नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अन्यथा मोर्चा निघाल्या स कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी .आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या की जर कर्मचारी किंवा नगरपालिका प्रशासनाचा अधिकारी समोर आला तर त्याला खडे बोल सुनावणार अशा प्रतिक्रियांमुळे घोडके च्या घोडके जनता रस्त्यावर आलेली आहे. जनतेची मागणी अशी आहे की पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी टाईम टेबल द्यावा आणि कोणत्या परिसरात कोणत्या वेळेला पाणी सोडण्यात येईल असा तक्ता किंवा मार्गदर्शक सूचना लावाव्यात अशा मागण्या आहेत.

