नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांची वाता हत संपेल कधी?

WhatsApp Image 2025-05-26 at 10.01.48 AM

गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे हाल सुरूच आहेत. मात्र, कोणताही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांच्या या हालअपेष्टांकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही.

सफाई कामगार घाणीत काम करत असताना त्यांच्या पायात गमबूट नसतात, हातात योग्य हातमोजेही नसतात. ज्या लोट गाड्यांवर घान कचरा वाहून नेतात, त्या गाड्यांना बेरिंगची चाकेही नसतात. त्यामुळे अक्षरशः बैलांसारखे त्यांना त्या गाड्या ओढून न्याव्या लागतात. यामुळे त्यांच्या पोटात गोळे उठतात, तसेच आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

या सगळ्या परिस्थितीकडे सहिष्णुतेने आणि संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. ही एक रास्त आणि न्याय्य अपेक्षा आहे, जी सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नगर पालिका कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली जात असताना, सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची व आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांकडे योग्य त्या मागण्या नागरिकांनी व संघटनांनी लावून धराव्यात, असे अनेक जागरूक नागरिकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page