_मुख्य बाजारात अतिक्रमणामुळे श्वास कोंडला. नगरपालिकेचे पथक गेले कुठे ??? संतप्त अमळनेर करांचा सवाल.._

1000111863.jpg

अमळनेर शहरातील मुख्य असलेली बाजारपेठ मातोश्री पान सेंटर ते विजय मेडिकल या परिसरात नागरिकांची व शहरवासीयांची बाजारासाठी लगबग सुरू असते परंतु त्या ठिकाणी असलेले भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते आणि फिरत्या लोट गाडीवाले यांच्यामुळे अक्षरशा यात्रेचे स्वरूप निर्माण झालेले असते लहान वाहनधारक मोठे वाहनधारक हे पण त्या रस्त्याचा वापर करतात. परिणामी त्या बाजारपेठेते एकमेकांना धक्काबुक्की लागते व तिथे भांडणे होतात वादविवाद विकोपाला जाऊन बऱ्याच वेळा जातीय दंगली उसळतात. नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण पथकाची तेथे नियुक्ती केलेली आहे कर्मचाऱ्यांनी कर्तव्या वर असताना दिवसभर येथे थांबावे जेणेकरून गर्दी होणार नाही व नागरिकांना व्यवस्थित बाजार करता येईल. तात्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता ताई पाटील होत्या त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अमळनेर शहराला चांगली शिस्त लावली होती प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर प्रशासनाला जनतेच्या समस्यांची काही देणे घेणे उरले नाही असे जाणकार अमळनेर करांचे मत आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून अंमळनेर भाजीपाला मार्केट तसेच मुख्य मार्केट मधील अवाजवी वाढलेले अतिक्रमण काढण्यास सक्तीने पाऊल उचलावीत. हीच  बाभळी अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page