*मानवतावादी आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी बहुजन महामानवांनी अंधश्रद्धा , कर्मकांड व रुढी परंपरा यांचा विरोध केला… इतिहास अभ्यासक गंगाधर जी बनबरे.*
अमळनेर (प्रतिनिधी) : बहुजन महामानव यांनी अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अनिष्ट प्रथांचा विरोध करून मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज घडविला. आज ग्रामीण भागात लग्न समारंभ तसेच लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी कर्ज घेऊन फाजील खर्च केला जातो, हे एक वास्तव आहे. त्यामुळे मुलांना मोठी स्वप्ने दाखवावीत आणि त्यांच्या आयुष्यात विचारपूर्वक दिशा द्यावी. आई-वडिलांना देव मानून त्यांच्या सेवेची भावना मनाशी बाळगावी. संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवण्याचे भान समाजाला देणे हे काळाची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील लोंढवे गावात प्रबोधनपर
व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री. बनबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील हे होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सौ. भारती पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. त्यांना सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री. आशोक पाटील यांचे सहकार्य लाभले. बाळविवाहविरोधी जनजागृती, सामाजिक सुधारणा आणि युवकांमध्ये वैचारिक जागृती यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र वाचनालय जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केले. यानंतर सौ. भारती पाटील, मोनिका नेमाडे, गोविंद लोखंडे, शैलेश इंगळे यांसारख्या मान्यवरांनी आपले विचार मांडले.
श्री. आशोक पाटील यांनी बालविवाहमुक्त समाजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवून लोहे गावातील ग्रामस्थ, महिला सेवा संघ, युवा कल्याण प्रतिष्ठान, मैत्री क्रांती संघ आणि अमळनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रित करून हा कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर पवार, मीनाबाई पाटील, डॉ. कृणाल पवार, दिलीप गोरख पाटील, नारायण अडगे, सोपान पाटील, कैलास वसंत पाटील, प्रभाकर आभाणे, संतोष अजमेरा, गौरी भागवत, गौरी पाटील, बलराम पाटील, दीपक पाटील आणि श्रीराम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
