वाळू  तस्करांनी अमळनेर मध्ये मांडला उच्छाद..ताई साहेब तुमचा मानसपुत्र तुमच्या नावावर करतो अंमळनेर मध्ये रेतीचा काळाबाजार..

IMG_20250610_130334.jpg


अमळनेर. तालुक्यातील हिंगोणे गावाच्या बोरी नदी तीरावर फापरे बंधाऱ्याच्या उत्तरेला रात्री अकरा पासून तर सकाळी सात वाजे पावैतो हजारो ब्रास रेतीचे शेकडो ट्रॅक्टर यांच्या मदतीने रात्रंदिवस होते आहे उत्खनन व चोरी. प्रत्येक ट्रॅक्टर मालकाच्या मागे अंमळनेर मधील बड्या नेत्यांचे कार्यकर्ते. प्रशासनाची त्यामुळे दातखिळी बसली आहे. महिन्याकाठी कोट्यावधी रुपयाची रेती बिल्डरांच्या घशात घातली जाते. हजारो ट्रॅक्टरचा करून रेतीचे मोठमोठे ढीग(ठिया) लावले जातात रात्रभर हे काम चालू असते आणि दिवसभर हायवा ,डंपर, ट्रक, यांच्या साह्याने ठीक-ठिकाणी रो हाऊसेस, मेगा सिटी प्लॅन ,मोठ्या नवीन वसाहती. अशा जागी रेती प्रसार केली जाते. एकेका मालकाचे चार -चार ,पाच- पाच ट्रॅक्टर असून. प्रत्येक रेती चोराच्या नावावर अनेक वेगवेगळे गुन्हे आहेत. त्या ट्रॅक्टर मालकांवर अमळनेर मधील गुंडांचा तसेच राजकीय ताई दादांचा येथे आशीर्वाद रुपी आर्थिक हात भार सदैव पाठीशी आहे त्याचमुळे प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकारी हाताची घडी आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. कारण त्यांचा महिनाकाठी लाखो रुपयात उत्पन्न स्रोताचा आलेख वाढण्यात मदत होते असे जाणकारांचे मत आहे. आजच्या जिल्ह्यातून नाही एवढी रेती  फापरे बंधाऱ्याच्या वरून उचल होते. घरकुल च्या नावाने मोठ्या मोठ्या बिल्डरांच्या साईटवर उपसली जाते. ट्रॅक्टर खाली करण्यासाठी पाठीमागे मालकांची फोर व्हीलर जाते त्या फोर व्हीलर मध्ये चार चार मालक सोबत असतात प्रत्येकांच्या ट्रॅक्टर खाली करण्यासाठी फोर व्हीलर फिरत असतात हा गोरख धंदा सकाळी पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत चालतो. त्यामुळे अंमळनेर मधील रहिवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. कोणी विरोध केल्यास जागच्या जागी त्यांच्याशी हुज्जत घालतात. जीवे ठार मारण्याची धमकी देतात. एवढा अनन्य अत्याचार  अमळनेरची जनता सहन करते आहे. कोणीच त्यांना वाली नाही. कोणीच त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारा मायचा लाल पैदा झालेला नाही. अशी रहिवाशांची आप बीती आहे. रेती चोरी करणारे वाळू तस्कर ,वाळू माफिया यांची लवकरच यादी जाहीर करणार आहोत पुरावे निशी..  क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page