अमळनेर तालुक्यातील फापोरे, हिंगोणे बंधाऱ्यातील बोरी नदीच्या रेती तस्करीचे भयान वास्तव..

IMG_20250611_070704.jpg


अमळनेर  शहराच्या दक्षिणेला बोरी काठावर हिंगोणे गाव वसले आहे. त्या गावातून गेल्यावर नदीमध्ये  बंधारा बांधला गेलेला आहे  बंधार्‍या वर उभे राहून दक्षिणेला नदीपात्रात पाहिले तर रात्रभर 200 ते 250 कामगारांच्या कडून रात्रंदिवस ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या रेती अर्थात वाळूने भरण्याचे काम सतत सुरू असते. नदीपात्रात ट्रॅक्टर ये जा करण्यामुळे  असंख्य रस्त्यांच्या वाहिन्या बनलेल्या आहेत. हे वास्तव बघायचे असेल तर सकाळी ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी नदीत उतरून जावे. अक्षरशः थक्क करणारे दृश्य दृष्टीस पडते.  रेतिचा कसलाही लिलाव नाही ,ट्रॅक्टर वाल्यांकडे कसलं परमिट नाही ,रॉयल टी, तसेच कोणताही परवाना नसून बिनधास्त, बेधडक रेती उपशाचे काम सुरू आहे. प्रशासनाची टीम या कामाला रोखण्यासाठी नियुक्त केलेली आहे. परंतु मगरूर ट्रॅक्टर मालकांच्या दहशतीमुळे तसेच त्यांना मिळालेल्या राजाश्रयामुळे कोणताही प्रशासनातील अधिकारी रेती उत्खनन रोखण्याचे काम करण्यासाठी धजावत नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आमच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन विचारले असता त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही जे काही सांगतात ते सर्व चुकीचे आहे असा कसलाही प्रकार नदीपात्रात होत नाही. अशा अतिविश्वासाने अधिकारी बोलतात. त्यांना पुरावे दाखवले किंवा चलचित्र दाखवले तर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे असतात त्यांची निष्क्रियता लपवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड नजरेस पडते. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांचा या प्रकारामध्ये हात असेल त्यांना त्वरित बळतर्फ करावे अशी नागरिकांची मागणी आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम आणि गुन्हा यांच्यावर दाखल व्हावा तसेच बोरी नदी पात्राची केलेले अतोनात नुकसान याचेही जबाबदारी यांच्यावर टाकावी. जर का राजकीय नेत्यांचा त्यांना या गोष्टी करण्यासाठी समर्थनार्थ दबाव येत असेल तर त्या राजकीय नेत्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य माणसाला हा एवढा रेती चोरण्याचा उत्खननाचा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा, बेकायदेशीर वाळू चोरीचा प्रकार उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या लक्षात येत नसेल का हा  यक्ष प्रश्न आहे. रेती भरलेल्या ट्रॅक्टरचे चलचित्र किंवा फोटो आमच्या प्रतिनिधींनी घेतले आहेत त्या ट्रॅक्टरवर व ट्रॅक्टर मालकावर खरेदी चोरीचा गुन्हा त्वरित दाखल व्हावा अशी अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page