घरकुल च्या नावाने बोरी नदीपात्रातील वाळू तस्करी व उत्खनन.. मूग गिळून  गप्प प्रतिनिधी तथा प्रशासन …

IMG-20250609-WA0003.jpg

अमळनेर प्रतिनिधी वाळू उत्पन्नाचे परवाने नसून अमळनेर येथील बोरी पात्राला वाळू रहित करण्याचा जणू रेती तत्कारांनी  चंगच बांधला आहे. नैसर्गिक रेती बनण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी शेकडो वर्ष प्रक्रिया सतत चालू राहते नदीला पूर येतो त्यामुळे मोठ्या दगडांचे व खडकांचे हळूहळू निरंतर रेती मध्ये रूपांतर होते ज्या गावाच्या नदीपात्रात रेतीचा साठा जास्त त्या गावातील शेतकरी सुखात याचाच अर्थ नदीपात्रात वाळू मुबलक तर विहिरींना पाणी मुबलक. परंतु बोरीच्या नदीपात्रातून हजारो ब्रास रेती दररोज वाहून नेली जात आहे. या सर्व बाबींवर अंकुश ठेवण्याचे काम, प्रशासनाचे अर्थात तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि पोलीस कार्यालय. या सगळ्यांनी कामांमध्ये कचुराई केल्यास लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर दबाव आणायचा याचाच अर्थ इथले लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो किंवा खासदार हे या विधानसभा क्षेत्राचे व लोकसभा क्षेत्राचे रखवाल दार आहेत रक्षण करते आहेत. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींचे प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर अंकुश नसल्याकारणाने निसर्गाची पर्यायाने नदीची हानी होत आहे. याचाच अर्थ कुंपणच जर शेत खात असेल तर शेतकऱ्याने किंवा शेतमालकाने करावे तरी काय. हा प्रकार अंमळनेर येथे सुरू आहे. राज्य सरकार व प्रधानमंत्री यांच्या प्रधानमंत्री आवास योजना आणि घरकुल योजना याच्यासाठी रेती ठोकतात देण्याची तजवीज सरकारने केलेली आहे परंतु घरकुल च्या नावाने मोठ्या मोठ्या प्रकल्पांसाठी व विकासकांच्या विकास कामासाठी अमळनेर शहरात चौफेर सुरू असलेल्या मोठमोठ्या बिल्डरांच्या रो हाऊसेस साठी प्रोजेक्टसाठी इन्फ्रास्ट्रक्चर साठी हजारो ब्रास रेतीचे दररोज चोरी आणि उत्खनन सुरू आहे. सर्वसामान्य लोकांना याचे काहीही देणे घेणे नाही परंतु एका ट्रॅक्टरचा एका महिन्याचा हप्ता लाखोच्या घरात आहे एका टेम्पोचा महिन्याचा हप्ता हजारोंच्या घरात आहे दिवस-रात्र कमीत कमी 100 ट्रॅक्टर व 250 टेम्पो रात्रंदिवस नदीपात्रातून रेतीचा उपसा करताना जिसने नित्याचेच झालेले आहे आपणास पुरावा पाहिजे असल्यास आमच्या जवळ यावे शेकरूप रास रेतीचे साठे व गंज बऱ्याच ठिकाणी दृष्टीस पडतात .त्याचे मंडळ अधिकारी, शहर तलाठी व त्यांचा चमु, तसेच तहसीलदार साहेब यांच्या संगनमताने लाखो रुपयाची देवाणघेवाण सर्रासपणे चालू आहे. अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये रेती चोरांचा हैदोस सुरू आहे. पद्धतशीरपणे हप्ते त्या त्या ठिकाणी पोहोचतात. रेती वाहतूक करणारे टेम्पो तसेच ट्रॅक्टर यांच्या रात्रंदिवस येणाऱ्या कर्ण कर्कश आवाजामुळे स्थानिक रहिवाशांचे जगणे हराम झाले आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची या प्रशासनाला जरा सुद्धा चिंता नाही. एकदा एका जागरूक पोलीस शिपायाने रेती चोरांच्या या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उलट पक्षी त्या पोलिसावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला नतमस्तक केले होते. खोटी तक्रार मागे घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागले होते. म्हणून तुम्ही आमचे काहीही करू शकत नाही. आमच्या नादी लागला त्याची खैर नाही.
या अविर्भावात, मिरवणारे राहणारे वाळू तस्कर यांना कोणी आवर घालेल का? असा सुजाण नागरिकांचा प्रश्न आहे. पुढच्या अंकाला रेती चोरी करणारे ट्रॅक्टर ,टेम्पो यांच्या नावासहित व नंबर प्लेट सहित यादी प्रकाशित करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी वाळूचे बेकायदेशीर साठे आहेत त्या सर्वांचे जागा निरीक्षण स्पॉट  इन्स्पेक्शन करून येणाऱ्या सात दिवसाच्या आत अहवाल आम्हाला मिळावा अशा आशयाचे पत्रक काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेले आहे. अशी माहिती मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page