मतदार संघात शिव रस्ते, शेत रस्ते, चिखलात…
बळीराजाचा पाय खोलात.,
भूमिपुत्र देणार का मदतीचा हात..???

IMG-20250602-WA0004.jpg

 

अमळनेर तालुक्यातील अर्ध्या अधिक खेड्यांत शेतात जाण्यासाठी शेत रस्ते पानंद रस्ते शेवटची घटका मोजत आहेत .पावसाळ्यापूर्वी पाऊस सुरू झाल्याने माशागतींना वेग आला आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेले क्षेत्र यांची पेरणी जवळ जवळ आटोक्यात आली असून शिव रस्ते आणि पानंद रस्ते असलेल्या शेतांना पावसामुळे रस्ते चिखलाने माखलेले आहेत म्हणून मशागती खोळंबल्या आहेत. काही आडदांड प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांमुळे शेतात वाहन जाण्यासाठी रस्ता नाकारला जातो .सरकारने नवीन परिपत्रकानुसार मागेल त्याला शेत रस्ते, वहिवाट रस्ते एका महिन्याच्या आत सातबारावर लावून द्यावेतअशी सूचना वजा तंबी शासनातील जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. अमळनेर मतदार संघातील अनेक शेतांच्या वाद विवादाच्या तक्रारी दाखल आहेत. शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता नसल्यामुळे शेतीची कामे करताना मनस्ताप व शारीरिक त्रास वाढतो. अमळनेर मतदार संघातील आमदार स्वतः शेतकरी असून त्यांना भूमिपुत्र म्हणून संबोधले जाते. प्रशासनाच्या पाठीमागे लागून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत रस्ते, शिव रस्ते आणि पानंद रस्ते तातडीने कसे करता येतील अर्थात त्यासाठी तुटपुंजी का होईना दगडी मुरूम टाकण्यासाठी ची आर्थिक उपाय योजना सरकार दरबारी करावी ,आणि तालुक्यातील मजबूर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा. हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page