*अमळनेर तालुक्यातील शेत रस्ते व शिवरस्ते अनेक वर्षापासून डबर, मुरूम खडीकरणाच्या प्रतीक्षेत.. शेतकऱ्यांची दैना थांबेल कधी?*

IMG-20250602-WA0004.jpg


अमळनेर. तालुक्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील शेत जमिनीमध्ये जाण्यासाठी शिव रस्ते ,शेत रस्ते व पानद  रस्ते. असून त्या रस्त्यांची दर पावसाळ्यात दुर्दशा होते त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना रस्त्यावरून वापरावे लागते, त्यांच्या शेती करण्यासाठी पेरण्यासाठी व पेरलेले कापून तयार करण्यासाठी शेतात जाणारे रस्ते चिखलाने भरलेले असतात .अर्थात त्यांच्यावरून चालणे दुरापास्त होते त्यांचा कळवळा कोणत्याही राजकीय पुढार्‍याला किंवा लोकप्रतिनिधीला नसल्यामुळे त्यांचे हाल होतात अनेक वेळा निवेदने देऊन , आवाज उठवून सुद्धा शिव रस्ते, शेत् रस्ते यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. कोणाचेही कोणाला सोयर सुतक नाही. त्यामुळे बळीराजा मेटा कुटीस आलेला आहे. माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार यांनी पुढाकार घेऊन अमळनेरचा शिवरस्त्यांचा प्रश्न मिटवावा. खापरखेडे ते डांगरी  अंबारे शिव लागून अनेक वर्षांनी प्रलंबित असलेला रस्ता का कुणास ठाऊक थांबलेला आहे? अक्षरशः शेतामध्ये शेत घुसल्यामुळे रस्त्याला रहदारीला अडथळा निर्माण होतो, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्ते बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत हीच नागरिकांची अपेक्षा. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतामध्ये जायला रस्ता नसल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट होते परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो याचे आत्म भान लोकप्रतिनिधीनी असू द्यावे. शेतकऱ्यांचा वाली कोणीही नाही परंतु आपला शेतकरी हाच आपला बहुसंख्य मतदार आहे हे सुद्धा ध्यानीमनी असू द्यावे . *शेतकरी सुखी तर जग सुखी* .म्हणून सर्व बाजूला ठेवून शिव रस्ते शेत रस्ते यांच्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकरी माय बापाची मुख्य मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page