अमळनेर नगर परिषदेचे ३ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन

images.jpeg


मागील काही दिवसापासून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामे यामुळे पाणी पुरवठा पाईप लाईन लिकेज होत्या तसेच जळोद डोह येथील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे शहरात पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होवून पाणीपुरवठा शहरात उशिराने सुरु होता.
मा मुख्याधिकारी तसेच नगरपरिषद पाणीपुरवठा टीम ने विशेष लक्ष देवून बहुतांश लिकेज दुरुस्ती केले तसेच मागील काही दिवसात झालेल्या पाण्यामुळे अमळनेर शहराला किमान १ महिना पुरेल इतके पाणी असल्यामुळे शहरात ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार शहरात पाणीपुरवठा आज पासून सुरु करण्यात आला आहे.(अचानक उद्भवलेल्या अडचणी, महावितरण वीज नसल्यास किवा इतर अडचणी आल्यास संबधित भागातील पाणी पुरवठा काही काळ विलंबाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page