“महाराष्ट्र पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रमुख भोकरे यांना मिळालेल्या धमकीच्या विरोधात निवेदन सादर.”

IMG_20250607_115733.jpg

अमळनेर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी ‘दैनिक जनप्रवास’ या वृत्तपत्रामध्ये एक वक्तव्य प्रसिद्ध केले होते. त्यांनी आपल्या लेखात असा सवाल उपस्थित केला की – “पाकिस्तानातील क्रिकेटपटू जसे त्यांच्या देशाबद्दल उघडपणे प्रेम व्यक्त करतात, तसेच बॉलीवूडमधील खान बंधूंनीही भारताविषयी स्पष्टपणे देशप्रेम दाखवायला हवे होते.”

या वक्तव्यानंतर काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे धमकी दिली –
“तू आठ दिवसांत माफी माग, अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ.”

या गंभीर प्रकरणाची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दांत निंदा करण्यात आली आहे. संघाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, सिद्धार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेऊन, दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीही पत्रकार संघाने केली आहे.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागणीनुसार, संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page