*लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीचा अभाव,,,
ताडे तलाव प्रेक्षणीय स्थळ म्हणून खाईल भाव,,,*

IMG-20250607-WA0002.jpg


अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपालिका हद्दीतील ताडेपुरा परिसर हा फार मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुन्या गोविंदाने रहिवास करीत आहेत. तो प्रभाग चोपडा रोड ,धरणगाव रोड, आणि पारोळा रोड आशा तीन तालुक्यांच्या प्रमुख रस्त्याच्या संगमाने  अमळनेर शहराच्या ताडेपुरा परिसराला जोडला गेलेला आहे. पावसाचे नैसर्गिक उतारामुळे जमलेले पाणी तसेच परिसरातील नागरिकांचे घरातील सांडपाणी एकत्र मिळून मोठा  तलाव निर्माण झालेला आहे. त्या तलावाची खोली दहा ते पंधरा फूट इतकी आहे. अनेक वर्षापासून ची संबंधित नागरिकांची मागणी आहे की त्या तलावाचा विकास करून आम्हा रहिवाशांना या साचलेल्या पाण्याच्या रोगराई पासून मुक्त करावे. वर्षभर ते साचलेल्या पाणी ,त्याच्यावर डासांची उत्पत्ती, अत्यंत घाणीचे साम्राज्य, त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या सर्वांना पर्याय म्हणून त्या  तलावाचा काया पालट करून पर्यटन क्षेत्र विकास करावा असे अनेक सुज्ञ नागरिकांचे कथन आहे. अनेक लोकप्रतिनिधी आले आणि गेले प्रत्येक निवडणुकीच्या वेळी परिसरातील नागरिकांना ताडे तलावाच्या विकासाचे गाजर दाखवून मतांची झोडी भरून घेऊन गेले, परंतु  नंतर त्या तलावाकडे किंवा नागरिकांच्या समस्यांकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. नागरिकांच्या पाठपुरावाच्या अभावामुळे व त्या गोष्टीचे सातत्य नसल्यामुळे उदासीन लोकप्रतिनिधी आणि  प्रशासन स्तब्ध आहे. दुसरी विशेष अधोरेखित करण्यासारखी बाब  म्हणजे त्या तलावापासून पाचशे मीटरच्या आत, भारतातील प्रसिद्ध प्राचीन मंगळ ग्रह मंदिर वसलेले आहे. त्यानिमित्ताने भारतातील काना-कोपरातून अनेक भाविक मंगळ ग्रहाला भेट द्यायला येत असतात. नगरपालिका प्रशासन आणि मंगळ ग्रह मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने सुद्धा त्या तारे तलावाचा विकास होऊन प्रेक्षणीय स्थळ म्हणून निश्चितच त्या  तलावाचा त्या अनुषंगाने त्या परिसराचा व त्या संदर्भात अमळनेर शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो. असे असंख्य जाणकारांचे व दूरदृष्टी असलेल्या लोकांचे मत आहे. त्या ठिकाणी वॉटर पार्क ,वॉटर गेम्स, प्रशस्त एस्सेल वर्ड अशा पद्धतीचे करमणुकीचे खेळ असले पाहिजे असे स्थानिकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ह्या देखील बातम्या वाचा

You cannot copy content of this page